अनेक दिवसांनी त्यांना हरवलं म्हणून हसा जरुर, पण भाजप वाल्यांना कमी कधीच लेखू नका. ते थांबले असतील, पण संपले नाहीत. संपणारही नाहीत. कारण ते कुठल्या एका घराण्याच्या सतरंज्या उचलणारे नाहीत. इतर पक्ष हे पक्ष नसून प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झाल्या आहेत.
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        गांधी प्रा लि, पवार-सुळे प्रा लि, ठाकरे प्रा लि.. त्यांच्याच पुढच्या पिढ्या थोपवल्या जाताहेत जनतेवर. भाजपने अनेक धुरंधर दिलेत त्यांची मुलं कुठं आहेत? अटलजींचा तर परिवारच नव्हता, सुषमा स्वराजांची मुलगी? पर्रिकरांची मुलं? जेटलींचीमुलगी? कुणी दिसलं कधी लाईमलाईट मध्ये?
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        आलेत कुणी फुकटचा वारसा घेऊन राजकारणात? भाजपात घरणेशाहीचे काही लहान अपवाद असतीलही, पण पार्टीअध्यक्ष, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री अशा पदांवर गेलेले अजूनही सेल्फ मेड लोक आहेत. अडवाणी अयशस्वी ठरले मग मोदी आले, गुजरातमधल्या आपल्या कामाच्या बळावर.
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        ते मावळतीला झुकतील तेव्हा नवीन कुणी सामान्यांतून आलेला तिथे येईल. कारण देशाला वाहून घेतलेल्या लायक लोकांची प्रचंड फळी तिथे आहे. ते संघटन देशाला वाहिलेलं आहे, कुठल्या रॉयल फॅमिलीला नाही. तिथे कुणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नाही येत.
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        काही चुका झाल्या असतील, पण त्या सुधारण्याची तिथे पद्धत आहे. अतिशय आक्रमक राजकीय टीकेची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात, शून्य कर्तृत्व सिद्ध करुनही & #39;ठाकरी शैलीत& #39; वगैरे वाभाडे काढायची उदाहरणे असणाऱ्या महाराष्ट्रात फडणवीस यांनीही आपली एक वेगळी जागा निर्माण केलीय-
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        शारीरिक स्थूलतेवरून अतिशय घाणेरड्या भाषेत टीका होऊनही कधीच त्याला प्रत्त्युत्तर न देऊन, राजकारणाशी संबंध नसणाऱ्या त्यांच्या पत्नीबाबतही ट्रोलिंग करणाऱ्यांना कधीही उत्तर न देऊन, केवळ जातीमुळे अनेकांसह ज्येष्ठ म्हटल्या जाणाऱ्या नेत्यांची "पेशवे" वगैरे टीका सहन करत शांत बसून...
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        अन याची नोंद इतिहास शांतपणे घेईल. महाराष्ट्रात जनतेने सर्वात मोठा पक्ष ठरवूनही भाजपवाले विरोधात बसणार आहेत याची नोंद असावी. विरोधात बसण्याची त्यांना सवय आहे. सत्ता गेली म्हणून पटापट उंदरासारखे या जहाजातून त्या जहाजात उड्या मारणाऱ्यातले त्यांचे लोक नाहीत. 2 वरून 305 वर जाणारे आहेत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        105 वरुन 144 गाठणं त्यांना अवघड नाही, अन त्याचं नियोजन ते उद्यापासून सुरु करतील. त्यामुळे चिंता त्यानी नाही, सत्तेत असलेल्या तीन तिघाड्याने करावी. कारण जितकी पावलं ते मागे जातील त्याच्या दुप्पट पावलं टाकत ते पुढे येतात हा इतिहास आहे.
 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Triangular flag on post" aria-label="Emoji: Triangular flag on post">
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Triangular flag on post" aria-label="Emoji: Triangular flag on post">
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4India
                    
                                    
                    
                    
                                    
                    
                    
                
                @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4India
 
                         Read on Twitter
Read on Twitter 
                                     
                                    